आजचं भारतीय तारुण्य नेमकं आहे कसं?
‘भारत हा तरुणांचा देश आहे’, हे घिसंपिटं वाक्य ऐकून आपण पुरते कंटाळलो आहोत. इथं घरात चॅनल बदलण्याची सत्ता नाही, त्यासाठी बंड पुकारावं लागतं आणि या देशातली व्यवस्था, समाज, तरुण बदलतील अशी भाषणं केली जातात, असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. मात्र, ‘मार्केट’ या देशातल्या तारुण्याकडे असं पाहत नाही. बाजारपेठेचे अभ्यासक शोधतच असतात, या देशातल्या तारुण्याचं व्यक्तिमत्त्व. …